8 जुलै 2026
घोडेश्वर नगरी न्यूज
वडिलांच्या छोट्या व्यवसायापासून जिल्ह्याच्या अभिमानापर्यंतचा प्रवास. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत गर्दी उसळणारे एकमेव सेंटर
---
घोडेश्वर प्रतिनिधी:सोलापूर-मंगळवेढा मुख्य रस्त्यालगत असलेल्या घोडेश्वर [बेगमपूर] गावाने आज संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे कारण आहे "ताकमोगे स्पेशल चहा".
*वडिलांच्या स्वप्नापासून जिल्ह्याच्या ब्रँडपर्यंत*
श्री. औदुंबर दत्तात्रय ताकमोगे यांनी वडिलांनी सुरू केलेल्या छोट्या चहाच्या व्यवसायाला आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने जिल्हाभर पोहोचवले. त्यांच्यासोबत बंधू श्री. लखन ताकमोगे आणि श्री. रामचंद्र ताकमोगे यांचीही मोलाची साथ आहे.
*यशाचे गमक: शुद्धता आणि वेळ*
आज भेसळीच्या काळात ताकमोगे चहाचे वैशिष्ट्य म्हणजे 100% शुद्ध गावाकडील म्हशीचे दूध. दर्जाशी तडजोड नाही हाच त्यांचा मंत्र आहे.
हे सेंटर दररोज पहाटे 5 वाजता सुरू होते आणि रात्री 9 वाजेपर्यंत चहाचा सुगंध दरवळत असतो.
*सर्वांसाठी हक्काचे ठिकाण*
ताकमोगे चहा सेंटर हे आता फक्त दुकान राहिलेले नाही. इथे बँक अधिकारी, शिक्षक, वकील, डॉक्टर, राजकीय मंडळी आणि कामगार सगळे एकाच बेंचवर बसून चहाचा आनंद घेतात. दररोज सोलापूर मंगळवेढा या हायवे वरती जाणारे येणारे वाहने हक्कानी थांबून चहाचा आनंद घेतात.
*व्यवसायासोबत समाजकार्य*
औदुंबर ताकमोगे हे समाजकार्यासाठीही ओळखले जातात. गरजूंना मदत करणे ही त्यांची ओळख बनली आहे. नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय उभा करून त्यांनी हजारो तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे.
आज घोडेश्वर गावाचे नाव जिल्ह्यात पोहोचवण्यात ताकमोगे चहाचा सिंहाचा वाटा आहे.
*पत्ता:* सोलापूर-मंगळवेढा रोड, घोडेश्वर , ता. मोहोळ, जि. सोलापूर
*वेळ:* सकाळी 5 ते रात्री 9
जाहिरातीसाठी व ताज्या बातम्यांसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा
संपादक: अमर पवार
मो.9763623853

0 टिप्पण्या