भीमा काठ हादरला..! 10 शेतकऱ्यांच्या केबल व मोटारींची चोरी..🙏🙏 अर्धनारी मध्ये चोरांचा सुळसुळाट, बळीराजा उद्ध्वस्त...!😭🙏🙏




भीमा काठ हादरला..!         10 शेतकऱ्यांच्या केबल व मोटारींची चोरी.. 🙏🙏 अर्धनारी मध्ये चोरांचा सुळसुळाट, बळीराजा उद्ध्वस्त...!😭🙏🙏

24 जून 2026

 ​ अर्धनारी: ता. मोहोळ: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेल्या अर्धनारी गावात चोरांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री तब्बल 10 हून अधिक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या तांब्याच्या केबल कापून नेल्या आहेत. या धक्कादायक घटनेने शेतकरी हतबल झाला आहे. ऐन उन्हाळ्यात शेती उद्ध्वस्त झाली असतानाच आताबळीराजा पूर्णपणे कोलमडला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. 🚨 मुख्य घटना आणि दुहेरी संकट.. ​ विद्युत केबलवर डल्ला..सोमवार ,दिनांक 22 जून २०२६ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी भीमा नदीकाठच्या 10 हून जास्त शेतकऱ्यांच्या विद्युत केबल चोरून जाळून टाकून नंतर नेल्या आहेत. त्यामुळे चोरांचे धाडस कसे वाढले आहे व त्यांना कोणाची पाठराखण आहे... हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी कसे द्यावे, २ तास लाईट आहे. असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.🙏 प्रत्येक शेतकऱ्याचे साधारणत: 5000 ते 10000 रुपयांचे नुकसान झाले आहे.🙏 ​ ​हातातोंडाशी आलेला घास हिरावून* घेणाऱ्या या चोरांनी अर्धनारीच्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. आता 'मायबाप' सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने सुस्त न राहता तात्काळ कृती करावी, हीच ग्रामस्थांची  तळमळीची मागणी आहे.🙏🙏 ​ पोलीस प्रशासनाला कडक आव्हान...पोलीस केवळ कागदी घोडे नाचवणार की चोरांना बेड्या ठोकणार? नदीकाठच्या भागात आणि शेत शिवारात रात्रीची पोलीस गस्त तात्काळ वाढवावी.🙏 चोरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना पोलीस खाक्या दाखवून कडक चोप द्यावा .​ अर्धनारी ग्रामपंचायतीला कळकळीची विनंती..! 🙏 गांभीर्य ओळखून गावातील मुख्य नाके, चौकांमध्ये आणि संवेदनशील भागात तात्काळ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवावेत,🙏🙏 जेणेकरून *चोरांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल.* ​शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी..🙏🙏 कर्ज काढून शेती आणि पशुपालन करणाऱ्या 10 हून अधिक बाधित शेतकऱ्यांना सरकारने तातडीने आर्थिक मदत किंवा नुकसान भरपाई जाहीर करावी. ​🙏🙏 "आधीच निसर्गाची मार सोसणाऱ्या बळीराजाच्या जखमेवर चोरांनी मीठ चोळले आहे.🙏 जर तात्काळ *पोलीस गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त केला नाही, तर अर्धनारी मधील शेतकऱ्यांच्या संतापाचा तीव्र उद्रेक होईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल!" असे अर्धनारी ग्रामस्थ व पीडित शेतकरी यांची कळकळीची मागणी करण्यात येत आहे.🙏🙏🙏🙏🙏




आपल्या परिसरातील निर्भीड  व ताज्या बातम्यांसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा संपादक: अमर पवार मो.9763623853

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या