आमदार राजू खरे यांची तालिका अध्यक्षपदी निवड*



घोडेश्वर नगरी न्युज: मुंबई येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२६ मध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांची तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.

यापूर्वीही अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार राजू खरे यांच्यावर तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या संसदीय कामकाजातील अभ्यासू वृत्ती, सभागृहातील सक्रिय सहभाग आणि प्रभावी कार्यपद्धतीची दखल घेत पुन्हा एकदा ही महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याचे मानले जात आहे. आमदार राजू खरे यांच्या निवडीमुळे निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


आपल्या परिसरातील निर्भीड बातम्यांसाठी,जाहिरातीसाठी व ताज्या बातम्यांसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा फॉलो करा.संपादक: अमर पवार मो.9763623853

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या