कामतीमध्ये डोळ्यात चटणी टाकून शेतकऱ्याचा खून*


मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द, तांडा येथे सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सहा एकर शेतीच्या वादातून शेतकरी संजीवकुमार नागनाथ शिंदे (वय ५२) यांच्या डोळ्यात चटणी टाकून तलवारीने वार करून खून करण्यात आला.

याप्रकरणी मृताची भावजय सुरेखा सतीश शिंदे हिने डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर दोन पुतणे रणजित सतीश शिंदे व रितेश सतीश शिंदे यांनी हात, गळा व डोक्यावर तलवारीने वार केले. याप्रकरणी मृताची पत्नी सुनीता संजीवकुमार शिंदे यांनी कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपींनी सुनीता शिंदे यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.

संजीवकुमार शिंदे गावात दूध व पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.

---
जाहिरातीसाठी , निर्भीड व ताज्या बातम्यांसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा , लाईक करा व शेअर करा संपादक: अमर पवार मो.9763623853

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या