25जून 2026
बेगमपूर : मोहोळ तालुक्यातीलअर्धनारी गावामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चोरट्यांचा फटका बसला आहे. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी बसवलेल्या विद्युत मोटारीची महागडी केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पिके धोक्यात आली आहेत.
काय घडले?
पीडित शेतकरी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे नदीला गेले असता मोटारीची केबल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुमारे 70,000 ते 75,000 रुपये किंमतीची तांब्याची केबल कापून नेली. पिकांना पाणी देण्याचा एकमेव आधारच चोरीला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पोलिस घटनास्थळी दाखल
शेतकऱ्याने तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेताची पाहणी करून पंचनामा केला. चोरट्यांनी केबल कशी कापली, घटनास्थळावर काही पुरावे सापडतात का याचा तपास पोलिसांनी केला.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
एका महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी नदीकाठी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरटे मोटार, केबल, स्टार्टर यासारखे साहित्य चोरून नेतात. शेतातील पिके पाण्याअभावी वाया जात आहेत.शासनाने रात्रीची गस्त वाढवावी," अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस श्री नागेश कानडे करत आहेत.
आपल्या परिसरातील निर्भीड,ताज्या बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा, फॉलो करा.
संपादक: अमर पवार
मो.9763623853


0 टिप्पण्या