15 जुलै 2026
घोडेश्वर नगरी न्यूज
*रस्त्याच्या डिव्हाईडर मध्ये अपघात झालेल्या मोटर सायकलची डमी आणि प्रबोधनाचा फलक*
बेगमपूर, दि. १४ (प्रतिनिधी) - वाढते अपघाताचे प्रमाण आणि होणारी जीवितहानी याला आळा बसावा यासाठी कामाती पोलिस स्टेशनच्या वतीने विविध प्रकारे वाहनधारक नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. यातीलच एक भाग म्हणून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन तसेच चुकीच्या पद्धतीने क्रॉस करणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगावर नियंत्रण, हेल्मेट वापर याविषयी महामार्गावरील रस्त्यावर विविध ठिकाणी जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत. बेगमपूर याठिकाणी असलेल्या डिव्हाईडरच्या मध्यभागी अपघात झालेल्या डमी मोटार सायकलची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. या डमी कडे पहिल्यानंतर वाहन धारकांमध्ये एक प्रकारचे अपघाताचे चित्र समोर उभे राहते. यामुळे वाहन चालवताना काळजी घेऊन चालवले पाहिजे अशा प्रकारचा विचार नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
या उपक्रमाबद्दल कामाती पोलीस स्टेशनचे सा. पो. नि. बसवेबर जाकीकोरे आणि त्यांच्या सहकार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
*हेल्मेट नाही डोक्यावर, मृत्यू उभा आहे दारावर!*
_वेळ कमी, जीवाची हमी_
*कामाती पोलीस स्टेशन*
जाहिरातीसाठी व ताज्या बातम्यांसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा
संपादक: अमर पवार
मो.9763623853

0 टिप्पण्या