दबंग पोलीस अधिकारी भरत चंदनशिव यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार*

18 जुलै 2026
घोडेश्वर नगरी न्यूज 


*सोलापूर (प्रतिनिधी ) येथील एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक  पदावर कार्यरत असलेले भरत चंदनशिव यांची नुकतीच शहर गुन्हे शाखा सोलापूर या ठिकाणी प्रशासकीय बदली झाली असून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून शहर गुन्हे शाखा येथे पदभार स्वीकारला आहे.
पत्रकार सुरक्षा समिती वतीने शहर गुन्हे शाखा कार्यालय येथे दबंग पोलीस अधिकारी भरत चंदनशिव यांची भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या 
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव म्हणाले की सोलापूर शहरातील जबरी चोरी घरफोडी मोटारसायकल चोरी सह अन्य गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विशेष प्रयत्न राहील. त्याच बरोबर कायदा सुव्यवस्था सामाजिक सलोखा व गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवून शहर गुन्हे शाखेचा दबदबा व गुन्हेगारावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न राहील.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव गणेश निंबाळकर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी विष्णू सकट संदीप धोत्रे रशीद शेख महंमद तांबोळी इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

जाहिरातीसाठी व ताज्या बातम्यांसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा संपादक: अमर पवार मो.9763623853

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या