बेगमपूरला शेतीसाठी फक्त 2 तास वीज! पिकं वाळली, शेतकरी हवालदिल - प्रशासन झोपलंय का?


*2 तास लाईट म्हणजे शेतकरी उध्वस्त झाला*


*घोडेश्वर 22 जून:* बेगमपूर परिसरातील शेतकऱ्यांसमोर सध्या मोठे संकट उभे राहिले आहे. शेतीच्या मोटारीसाठी महावितरणकडून फक्त *2 तासच वीज* पुरवठा केला जात असल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.


*शेतकऱ्यांची व्यथा:* 

"पाऊस अजून पडला नाही. विहिरीला पाणी आहे, पण लाईटच नसल्याने मोटार चालवता येत नाही. 2 तासात किती शेती भिजणार हा प्रश्न आज शेतकऱ्यांपुढे आहे. पिकं जळून चाललीत," यामुळे बेगमपूर येथील शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.


*प्रशासनाचे दुर्लक्ष:* 

खरीप हंगाम तोंडावर आला असताना वीज कपातीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. *किमान 6 तास वीज* मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळू शकला नाही.


*शेतकऱ्यांचा सवाल:* 

"शहरात 24 तास लाईट, मोठ मोठ्या कंपनीला 24 तास लाईट आणि आम्हाला 2 तास? आम्ही जगायचं कसं? प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, नाहीतर आंदोलन करू," असा इशारा शेतकरी वर्गातून दिला जात आहे.


_- अमर पवार, घोडेश्वर नगरी डिजिटल न्यूज_

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या