खा. संजय दीना पाटील यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक, मुख्यमंत्र्याकडे केली मागणी

30 जून 2026 
घोडेश्वर नगरी न्यूज 





सोलापूर (प्रतिनिधी)  खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असून पत्रकारांबाबत वापरण्यात आलेली भाषा ही अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय असून लोकशाही व्यवस्थेत पत्रकार हे जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत एका खासदाराने पत्रकारांविषयी अवमानकारक भाषा वापरणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे. या बाबत 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खासदार संजय दिना पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,  तसेच भविष्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांचा अवमान होणार नाही यासाठी कठोर भूमिका घेण्याचे आवाहन  पत्रकार सुरक्षा समिती वतीने  करण्यात आले. या घटनेमुळे  पत्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण असून, पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी  पत्रकार सुरक्षा समिती वतीने संघर्ष सुरूच राहील तरी मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  खासदार संजय दीना पाटील यांच्यावर कारवाई  कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी पत्रकार सुरक्षा समिती वतीने करण्यात आली 
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा सचिव अंबादास गज्जम  सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी श्रीनिवास पेद्दी विष्णू सकट संदीप धोत्रे दत्तात्रय बनसोडे सह पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.


आपल्या परिसरातील निर्भीड, ताज्या बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा संपादक: अमर पवार मो.9763623853

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या