ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी*

28 जून 2026
घोडेश्वर नगरी न्यूज 


  ज्ञानदीप संस्कार भारती व बहुउद्देशीय संस्था, मंगळवेढा संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल येथे सामाजिक समता, शिक्षण आणि लोककल्याणाचे पुरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा शेख यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर, सामाजिक सुधारणांवरील योगदानावर आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यावर प्रगती भाषणे सादर केली. यावेळी सहशिक्षक सुभाष कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक न्याय, स्त्रीशिक्षण आणि सर्वसमावेशक विकासासाठी केलेल्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा असे प्रतिपादन केले. 

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी सलगर, सचिव सिद्धेश्वर सलगर, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अर्चना सलगर यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका प्रतिभा राजमाने यांनी केले, तर सोनिया भंडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.


जाहिरातीसाठी व ताज्या बातम्यांसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा संपादक: अमर पवार मो.9763623853

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या