राजकारणात जनसेवेचा वसा घेऊन काम करत असताना अनेक व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ होतो, पण काही भेटी मनावर कायमची छाप सोडून जातात.

5 जुलै 2026
घोडेश्वर नगरी न्यूज 


आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, आदरणीय सुनेत्रा वहिनी अजित दादा  पवार यांची भेट घेण्याचे भाग्य लाभले. असे शुभारंभ बँकेचे सर्वेसर्वा श्री गणेश सूर्यवंशी यांनी सांगितले 

​याप्रसंगी, आदरणीय वहिनींना मी श्री विठ्ठल-रुक्मिणी माऊलींची प्रतिमा भेट दिली. आपल्या लाडक्या विठ्ठल-रुक्मिणीचा आशीर्वाद आणि ती स्मृती त्यांना भेट देताना मनाला एक वेगळेच समाधान लाभले. आजचा  हा क्षण माझ्यासाठी कायम स्मरणात राहील.

याप्रसंगी, शुभारंभ अर्बन बँकिंग ग्रुप च्या माध्यमातून आम्ही राबवत असलेल्या विविध उपक्रम आणि बँकिंग सेवांची माहिती त्यांना सविस्तर दिली. त्याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस (सहकार विभाग) म्हणून जबाबदारी पार पाडताना करत असलेल्या कामाचा अहवाल सादर केला.



वहिनींशी चर्चा करताना एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवली. त्यांनी केवळ माहिती ऐकून घेतली असे नाही, तर प्रत्येक विषयाची अत्यंत बारकाईने चौकशी केली. सहकार क्षेत्र भविष्यात अधिक सक्षम कसे करता येईल, यावर मार्गदर्शन करत त्यांनी मला भविष्यातील नियोजनासाठी मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले. त्यांची ही स्पष्टता, निर्णयक्षमता आणि कामाप्रती असलेली निष्ठा पाहता, त्यांच्या कार्यशैलीमध्ये आदरणीय अजितदादा पवार यांच्या कर्तृत्वाची आणि शिस्तीची प्रचिती आली.

ही भेट माझ्यासाठी केवळ एक राजकीय भेट नव्हती, तर ती एक नवी प्रेरणा होती. माझ्यावर सोपवलेली जबाबदारी आणि वरिष्ठांचे हे मार्गदर्शन, निश्चितच माझ्या पुढील प्रवासाला अधिक गती देईल. जिल्ह्यातील सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी, अशाच निष्ठेने यापुढे कार्य करत राहण्याचा ध्यास आहे.
​आपला नम्र,

श्री.गणेश ब्रम्हदेव सूर्यवंशी
चेअरमन शुभारंभ ग्रुप
जिल्हा सरचिटणीस, सहकार विभाग
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर.

जाहिरातीसाठी व ताज्या बातम्यांसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा संपादक: अमर पवार मो.9763623853

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या