17जुलै 2026
घोडेश्वर नगरी न्यूज
🚨 उजनी धरणातून पाणी सोडण्याचा इशारा 🚨
उजनी धरणाच्या पॉवर हाऊस आउटलेटमधून उद्या दिनांक - 18 जुलै 2026 रोजी सकाळी 6:00 वाजता (6:00 AM) आषाढी वारीसाठी 1600 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रामधून सोडण्यात येणार आहे.
आवश्यकतेनुसार पुढील टप्प्यांमध्ये विसर्गाचे नियमन करण्यात येईल.
सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये.
तसेच जनावरांना नदीच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवावे, जेणेकरून कोणतीही जीवित हानी होणार नाही. सर्वांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी.
सर्व संबंधित अधिकारी व यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, जेणेकरून कोणतीही हानी किंवा अनुचित घटना घडू नये.
सु. उ. डुंबरे
कार्यकारी अभियंता,
उजनी धरण व्यवस्थापन विभाग,
भीमानगर.
जाहिरातीसाठी व ताज्या बातम्यांसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा
संपादक: अमर पवार
मो.9763623853

0 टिप्पण्या